Tuesday, September 16, 2025
Homeकोल्हापूरअखेर माधुरी हत्तीणी प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

अखेर माधुरी हत्तीणी प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी प्रकरणात सुनावणी घेण्यास अखेर सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. या प्रकरणावर उद्या शुक्रवारी (दि.१२) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या पिठासमोर होणार सुनावणी होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनताराकडे सोपवण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांच्या रोशानंतर राज्य सरकार आणि मठाच्या वतीने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र मागच्या महिन्याभरापासून त्यावर सुनावणी झालेली नव्हती. अखेर याचिकाकर्त्यांनी पुन्हा प्रकरण मेंशन केल्याने कोर्टाने उद्या सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे उद्या कोर्ट काही महत्वाचे निर्देश देतं का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील ‘वनतारा’मध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि एएस चंदुकर यांच्या खंडपीठाने ही याचिका सुचीबद्ध करण्यासाठी सहमती दर्शवली होती. यानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण

 

नांदणी मठातून ‘माधुरी हत्तीणी’ला २८ जुलै रोजी जामनगर येथील ‘वनतारा’च्या राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवण्यात आले होते. ‘माधुरी’ला वनताराच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.

 

राज्य सरकार आणि मठाच्या वतीने दाखल याचिकेवर होणार सुनावणी

 

स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला १,२०० वर्षांची परंपरा असून या मठाकडे ४०० वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना, प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्यानुसार नांदणी येथील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरात येथील वनतारामध्ये पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याविरोधात नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण मठाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारनेही या प्रकरणात धाव घेत पुन्हा याचिका दाखल केली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात सकारात्मकता दर्शवली आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -