प्रारंभिक समभाग मूल्य म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होतात. यातील काही कंपन्या मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजारावर गुंतवणुकीसाठी खुल्या होत्यात. तर काही कंपन्या या बीएसई, एनएसई अशा दोन्ही मंचांवर येतात.
दरम्यान सध्या देशातील प्रसिद्ध असलेल्या टाटा ग्रुपच्या टाटा कॅपिटल या फायनान्स कंपनीचा आयपीओ येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार या आयपीओची वाट पाहात होते. आता हा आयपीओ कधी येणार हे समोर आले असून या आयपीओच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवण्याची संधी चालून आल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा कॅपिटलचा आयपीओ पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. या आयपीओच्या माध्यमातून एकूण 21 कोटी नवे शेअर्स इश्यू केले जातील. तर 26.58 कोटी शेअर्स ओएफस श्रेणीतील असतील.
टाटा कॅपिटल या आयपीओ एकूण 47.58 कोटी शेअर्स विकण्याची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आयपीओत टाटा सन्सतर्फे 2.3 कोटी शेअर्स विकले जाण्याची शक्यता आहे. याच आयपीओत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) 3.58 शेअर्स विकण्याची शक्यता आहे.

टाटा कॅपिटल या कंपनीत टाटा सन्सची सध्याची मालकी ही 88.6 टक्के आहे. टाटा कॅपिटलचा आयपीओत एका शेअरचे मूल्य किती असेल? तो नेमकी कधी येणार? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)