Friday, October 31, 2025
Homeसांगलीकाम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले;...

काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

आष्टा-बागणी रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकी अपघातात आष्टा येथील दोन तरुणांचा मृत्यू.ओम धर्मेंद्र शेडबाळे (२२) याचा जागीच मृत्यू; संदीप बाजीराव पाटील (३०) उपचारादरम्यान मृत्यूमुखी.

 

अशी या तरुणांची नावे आहेत. या अपघातात स्वप्नील संजय बागणे हा जखमी झाला आहे. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात बाबासाहेब कुमार वाडकर (वय ३९, मेन रोड आष्टा ) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. ३) रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी वाडकर यांच्या मावस भावाचा मुलगा ओम शेडबाळे नोकरीच्या ठिकाणाहून कोल्हापूर येथून दुचाकीवरून (एमएच १०, ईएफ ८५७३) आष्टा येथे येत होता. तो आष्टा-बागणी रस्त्यावरील सागर ढोले यांचे घरासमोर आला असता, आष्ट्याकडून बागणीच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच १०, बीडी ६६५७) आलेल्या संदीप पाटील याने त्याला समोरासमोर धडक दिली.

 

यात ओम शेडबाळे याचा जागीच मृत्यू झाला; तर गंभीर जखमी झालेल्या संदीप पाटील व त्याच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या स्वप्नील बागणे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी (ता. ४) संदीप पाटील याचाही मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. आष्टा पोलिस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -