Wednesday, November 12, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात दुहेरी हत्याकांड! जेवण न दिल्याने अट्टल चोरट्याने कंक दांपत्याला संपवलं; तो...

कोल्हापुरात दुहेरी हत्याकांड! जेवण न दिल्याने अट्टल चोरट्याने कंक दांपत्याला संपवलं; तो घरात शिरला अन्…

गुन्हे केल्यानंतर ओळख लपविण्यासाठी अट्टल चोरटा विजय गुरव निर्जनस्थळी लपायचा. शाहूवाडी तालुक्यातील गोलिवणे वसाहतीजवळ जाऊन त्याने कंक दांपत्याकडे जेवणाची (Kolhapur Crime News) मागणी केली.

 

जेवण देण्यास नकार दिल्याने त्याने निनू कंक व रखूबाई कंक यांना संपवल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. संशयित विजय गुरव पाच दिवस पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, खून, बाललैंगिक अत्याचार, मोटारसायकल चोरी अशा गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार विजय गुरव हा शाहूवाडी तालुक्यातील शिरगावचा राहणारा आहे. गुन्हा केल्यानंतर तो पोलिसांपासून (Police) बचावासाठी डोंगराळ भागात जाऊन लपायचा. १५ ऑक्टोबरला तो कडवी धरण क्षेत्रातील कंक दांपत्य राहत असलेल्या शेळीपालन शेडजवळ गेला होता.

 

त्याठिकाणी त्याने कंक यांच्याकडे जेवण मागितले. यातून त्यांच्यात वाद झाला. चिडलेल्या गुरवने दगडाने व लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत निनू कंक यांचा मृत्यू झाला, तर हा प्रकार पाहणाऱ्या रखूबाई यांनाही त्याने निर्घृणपणे ठार केल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

 

पोलिसांनी गुरव याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने खून करण्यामागील नेमके कारण जेवण न दिल्याचा राग होता की आणखी काही, तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार गुन्ह्यात सहभागी आहेत का, प्राण्याने हल्ला केल्याचा बनाव करण्यामागे कोणता हेतू होता, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलिस मिळवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -