राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कोल्हापूरच्या इचलकरंजी येथे भव्य अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे.जवळ-जवळ 25 फूट उंच हे स्मारक आहे. या निमित्याने आज इचलकरंजीकरांची अनेक वर्षांपासूनच्या मागणीला पूर्णरूप प्राप्त झालं आहे.
शंभूतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्यासह इचलकरंजी शहरातील शिवभक्त आणि शंभूभक्त यांची मोठ्या संख्येने गर्दी जमल्याचे बघायला मिळालेय.यावेळी मुख्यमंत्र्यानी छत्रपती शंभूमहाराजांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
यावेळी संपूर्ण परिसरात जय शिवराय, जय शंभूराजांच्या जय- जयकाराने दणाणून गेला. यावेळी महायुतीती प्रमुख नेते देखील प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजीत शंभूतीर्थ व्हावं अशी इचलकरंजीकरांची इच्छा होती. अशातच आता इचलकरंजी शहरातील मुख्य चौकात हा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेऊ, असं औरंगजेबला वाटले होते. परंतु एक छावा या ठिकाणी उभा होता, हे त्याला माहिती नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई हरलेली नाही. दगा झाला नसता तर या छाव्याला पकडण्याची कुणाची हिंमत झाली नसती. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.





