Saturday, April 18, 2026
Homeइचलकरंजीपंचगंगा प्रदूषणाविरोधात शिरढोण-टाकवडे येथे कडकडीत बंद

पंचगंगा प्रदूषणाविरोधात शिरढोण-टाकवडे येथे कडकडीत बंद

पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात शिरढोण व टाकवडे गावांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला.

 

सकाळपासून गावांमध्ये शांतता पसरलेली दिसून आली, तर नेहमीची वर्दळही कमी झाली होती. नागरिक मोठ्या संख्येने निषेध रॅलीत सहभागी झाले. विविध ठिकाणी घोषणाबाजी करत पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. युवक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.

 

पंचगंगा नदी ही परिसरातील गावांची जीवनवाहिनी असल्याने तिचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आंदोलनातून स्पष्ट करण्यात आले. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर तात्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलन करत प्रशासनाला ठाम इशारा दिला की, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -