Friday, April 24, 2026
Homeइचलकरंजीनृसिंहवाडीत कृष्णा नदीपात्रात आढळला बेवारस वृद्धेचा मृतदेह

नृसिंहवाडीत कृष्णा नदीपात्रात आढळला बेवारस वृद्धेचा मृतदेह

येथे कृष्णा नदीच्या पात्रात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कृष्णा नदीपात्रात पायऱ्यांच्या बाजूस एक मृतदेह तरंगताना दिसला.

 

नावाडी अरुण गावडे, मज्जित कलगी यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून तत्काळ पोलिस प्रशासनाला माहिती दिली. मृत वृद्धेचे वय अंदाजे ६० ते ६२ वर्षे असून अंगावर पिवळ्या रंगाची साडी आहे.

 

प्राथमिक अंदाजानुसार, पाण्यात बुडून या महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. सदर वृद्धेबाबत कोणास काही माहिती असल्यास शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. शिरोळ पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -