Homeइचलकरंजीइचलकरंजीत सायंकाळच्या पावसाने उकाडा; सकाळच्या पावसाने केले थंड

इचलकरंजीत सायंकाळच्या पावसाने उकाडा; सकाळच्या पावसाने केले थंड

गेल्या काही दिवसापासून वाढत्या उष्माने हैराण असलेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसापासून वाढत्या उष्म्याने शहरवासीय हैराण झाला आहे.

इतर शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, इचलकरंजीत हुलकावणी दिली होती. मात्र, सोमवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तासाहून अधिक पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.

तसेच पावसामुळे विविध भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र, चांगलीच धावपळ उडाली. दुपारी पडलेल्या पावसामुळे सायंकाळ नंतर पुन्हा नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.

दरम्यान आज मंगळवारी सकाळी आणखी पाऊस पडला. वातावरण ढगाळ राहिले. यामुळे हवेत गारवा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -