Homeइचलकरंजीइचलकरंजी : घरमालकाचा खून; एकास जन्मठेप

इचलकरंजी : घरमालकाचा खून; एकास जन्मठेप

महात्मा फुले चौक परिसरात राजेशकुमार देवकिशन जोशी यांना दूरध्वनी करून भाडेकरूचे वर्तन चांगले नसल्याचा आरोप करत २ जानेवारी २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास संदीप कांबळे याच्यासह नऊजणांनी जोशी यांच्या घरात शिरत भाडेकरुला रात्रीतून घर रिकामे करण्याची मागणी केली. त्यावेळी जोशी यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असता ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या जमावाने जोशी यांना फरफटत जिन्यावरून खाली ओढत आणत लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे जोशी बेशुद्ध पडले होते.

 

तर त्यांच्या बचावासाठी आलेल्या जोशी यांच्या पत्नीसही लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेचघराच्या खिडक्या फोडून जमावाने पलायन केले. उपचारादरम्यान राजेशकुमार जोशी यांचा मृत्यू झाल्याने खून प्रकरणी ९ जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत दहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची साक्ष, शवविच्छेदन अहवाल आणि पुराये तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधिश एल. डी. बिले यांनी ९ जणांना दोषी ठरवले.

 

यापैकी संदीप कांबळे यास जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंड तर प्रदीप दत्तात्रय कांबळे, महेश मारुती कांबळे, प्रिया संदीप कांबळे, प्रमिला प्रदीप कांबळे, अर्चना महेश कांबळे, बाळाबाई दत्तात्रय कांबळे, शोभा सुनिल कांबळे आणि जयश्री पांडुरंग कांबळे या आठजणांना ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जमा झालेल्या दंडाच्या रक्कमेतील ७५ हजार रुपये मयत राजेशकुमार यांच्या पत्नी संतोषदेवी यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्याचे सरकारी वकील एच. एन. मोहिते-पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -