Homeइचलकरंजीइचलकरंजी : मटका घेणारे चौघेजण ताब्यात

इचलकरंजी : मटका घेणारे चौघेजण ताब्यात

येथील गोकुळ चौक परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून मटका घेणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले असून अन्य दोघे पसार झाले. या कारवाईत पोलिसांनी ३० हजाराच्या ३ मोबाईलसह ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जान केरला आहे.

 

बाबाचत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहरातील गोकुळ चौक परिसरात उपडद्यावर मटका घेतला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी मटका घेताना दिलीप गणपती हारगे (वय ६० रा. तीनबत्ती चार रस्ता), अजित बाळासो कोरवी (वय ३० रा. जवाहरनगर कोरवी गल्ली), अश्विन नवरंग देशमाने (वय ४२ रा. गुजर माळ), सिध्दार्थ लहू कोकितकर (वय १९ रा. मरगुबाई मंदिरजवळ) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अनिल उर्फ बबलु पवार (रा. जवाहरनगर) आणि मोहन काजवे (रा. जुना चंदूर रोड) हे पसार झाले. या कारवाईत ३ मोबाईल आणि ४ हजार १०० रुपयांची रोकड असा ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम गजबरसाब सनदी यांनी फिर्यादी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -