Homeमहाराष्ट्रकेंद्र सरकारचा मोठा दणका, थेट साखरेचे भाव आपटले, नवा दर..

केंद्र सरकारचा मोठा दणका, थेट साखरेचे भाव आपटले, नवा दर..

सणासुदीच्या काळात साखरेचे दर झपाट्याने वाढताना दिसले. दिवाळीसारखे सण तोंडावरच असताना देशात साखरेचे भाव झपाट्याने वाढला. फक्त साखरच नाही तर तेल यासोबतच अनेक गोष्टींच्या किमती वाढत आहेत.

 

साखरेच्या साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. साखरेचे भाव जमिनीवर आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या साठा मर्यादेत थेट निम्मयाने कपात केली.

 

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा ठेवता येईल, ज्यापेक्षा अधिक नाही. यापूर्वी 4000 क्विंटल होती.

 

 

साठेबाजांकडून ऐन सणासुदीच्या काळात साखरेची मोठी टंचाई निर्माण केली जात आहे. ज्यामुळे बाजारात साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने मोठा दणका दिला.साखरेचे भाव वाढत असतानाच सरकारकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. साठेबाजांविरोधात सरकारने मोर्चा उघडला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला साखरेचे दर स्थिर ठेवणे मोठे आवाहन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -