Homeइचलकरंजीइचलकरंजी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन पाच गणेश मंडळावर कारवाई

इचलकरंजी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन पाच गणेश मंडळावर कारवाई

गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहाचे वातावरण असताना काही गणेश मंडळांकडून डीजेचा दणदणाट करण्यात आला. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाच गणेश मंडळांवर कारवाई केली.

 

पोलिसांच्या पथकाने संबंधित मंडळाच्या साऊंड सिस्टिमची तपासणी केली आवाजाची पातळी १०० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नवभारत ग्रुप (चंदूर), जयसेवालाल (इचलकरंजी), बैंड बॉयज (गुरुस्कलक नगर), टायगर ग्रुप (चंदर) आणि महाकाल बॉयज (दत्तनगर, कबनूर) या पाच मंडळांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक डॉ. आरती कनिरे यांच्या पथकाने केली. पोलीस अंमलदार प्रवीण फगरे, राहुल कामत, अमित भोसले यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -