पंचगंगा नदीकाठी संशयास्पदरीत्या नदीपात्राकडे जात असलेल्या महिलेच्या हालचालीवर निर्भया पथकाची नजर गेल्याने संभाव्य अनर्थ टळला.
रिहाना बाबासाहेब शेख (वय ३०, रा. शहापूर) ही महिला नदीपात्रात जात असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
तिच्याकडून मुंग्या मारण्याचे औषध, काचेचा तुकड़ा व पाण्याची बाटली आढळून आली. निर्भया पथक सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पंचगंगा नदीकाठी पेट्रोलिंग करीत असताना ही घटना निदर्शनास आली. चौकशीत आईसोबत किरकोळ बाद झाल्याने आत्महत्या करण्यासाठी नदीकाठी आल्याचे महिलेने सांगितले. पोलिसांनी तिला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणून समुपदेशन केले. त्यानंतर तिच्या वडिलांना बोलावून महिलेला सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
