Homeइचलकरंजीइचलकरंजी : रेल्वेच्या धडकेत युवतीचा मृत्यू

इचलकरंजी : रेल्वेच्या धडकेत युवतीचा मृत्यू

सदर घटना बुधवारी सकाळी पावणे आकरा वाजणेच्या सुमारास हातकणंगले गावच्या हद्दित डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृहासमोर रेल्वे रुळावर घडली याबाबतची वदीं ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी श्री जगवाणी यांनी हातकणंगले पोलीसांत दिली आहे

 

याबाबत माहिती अशी कि, अनुष्का ही रेल्वे पटरीवरून दोन मैत्रिणी सोबत चालत चालली होती. अनुष्का पुढे होती तर तीच्या दोघी मैत्रिणी आठदहा फुटाच्या अंतरावर पाठिमागे होत्या. अनुष्काच्या कानात हेडफोन असल्याने व मोबाईलवर बोलण्याच्या नादात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या धनबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीने तिला जोराने धडक दिली. यामध्ये सुमारे पन्नास ते साठ फूट अंतरावर उडून जाऊन तिचा देह पडला. या धडकेत ती जागीच गतप्राण झाली होती. मैत्रिणींनी मोठ्धाने ओरडून तिला बाजूला जाण्यास सांगत होत्या, मात्र त्यांचा आवाज तिला ऐकायला आला नाही. त्यांच्या डोळ्या देखत झालेल्या या भीषण धडकेने अनुष्काच्या अंगातील रक्ताच्या चिळकांड्या त्यांच्या अंगावर उडाल्या. यामुळे त्या प्रचंड भयभित होऊन बेशुद्ध पडल्या, त्यांच्यावरही जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन अनुष्काची ओळख पटवण्यात आली.

 

या घटनेनंतर पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह अंत्य संस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -