Homeमहाराष्ट्र१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम,...

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

व्हॉट्सॲपच्या बिझनेस व्हर्जनसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक युटिलिटी आणि सर्व्हिस मेसेजसाठी सुधारित दर लागू होत आहेत.

 

या नव्या नियमांनुसार, एका मेसेजसाठी 14 पैसे आकारले जाणार आहे. याबाबत मेटाकडून नवीन दरपत्रक जाहीर करण्यात आले. हे नवीन दर फक्त ‘व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म’ वापरणाऱ्या मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट्स आणि बँकांसाठीच लागू असणार आहेत.

 

सर्वसामान्य व्हॉट्सॲप युजर्स आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठी व्हॉट्सॲप आधीसारखेच पूर्णपणे मोफत राहील. वैयक्तिक मेसेजिंगवर याचा कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक भार पडणार नाही. हा नियम फक्त WhatsApp Business App किंवा API वापरणाऱ्या व्यवसाय/कंपन्यांसाठी आहे.

 

ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी किंवा सपोर्ट देण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या ‘सर्व्हिस मेसेजेस’वर आता प्रति मेसेज शुल्क लागू होईल. ३० सप्टेंबरपर्यंत ज्या कंपन्यांनी आपला पेमेंट मोड (कार्ड इत्यादी) ॲड केला नाही, त्यांना १ ऑक्टोबरपासून मेसेज पाठवता येणार नाहीत.

 

सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो?

 

व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, जर तुम्हाला वाटत असेल पण तसे नाही. व्हॉट्सॲप नेहमीप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी फ्रीमध्ये राहणार आहे. इतकेच नाही, तर तुम्ही बिझनेस अकाउंटवरून चॅटिंग करत असाल तर तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही नवीन बिलिंग प्रणाली फक्त मोठ्या कॉर्पोरेट आणि एंटरप्राइझ-स्तरीय बिझनेस API अकाउंट्सनाच लागू आहे.

 

मेसेजसाठी पैसे कोण देणार?

 

मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना स्वयंचलित संदेश पाठवणाऱ्या कंपन्या, बँका, ऑनलाइन शॉपिंग ॲप्स आणि मोठ्या स्टार्टअप्सकडून व्हॉट्सॲप प्रत्येक संदेशासाठी शुल्क आकारणार आहे. तुमच्या बँकेकडून जेव्हा तुम्हाला बॅलन्स अलर्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून डिलिव्हरीची माहिती किंवा एखाद्या कंपनीकडून ओटीपी मिळतो, तेव्हा त्या कंपन्या त्यासाठी पैसे देतात. हे सर्व पैसे थेट मेटाकडे जातात.

 

व्हॉट्सॲप मेसेजिंगचे नवे दर आणि नियम (१ ऑक्टोबरपासून लागू)

 

मेटाने १ जुलै २०२५ पासून २४-तासांच्या संभाषण-आधारित मॉडेलऐवजी प्रति-संदेश (Per-Message) शुल्क प्रणाली लागू केली आहे. १ ऑक्टोबरपासून यामध्ये अधिक मोठे बदल होत आहेत.

 

कंपन्या ज्या ऑफर्स, सेल्स, डिस्कॉऊंट आणि प्रमोशन्सचे मेसेजेस ग्राहकांना पाठवतात, त्यासाठी प्रति मेसेज अंदाजे ०.८६ पैसे (८६ पैसे) द्यावे लागतील. ऑर्डर स्टेटस अपडेट्स, डिलिव्हरी अपडेट्स आणि लॉगिन पासवर्ड (OTP) पाठवण्यासाठी प्रति मेसेज अंदाजे ११.५ पैसे खर्च येईल. यावर GST जोडल्यास एकूण खर्च प्रति मेसेज १४ पैसे होतो.

 

प्रत्येक व्यावसायिक फोन नंबरला (WhatsApp Business) ग्राहक सेवा आणि सहाय्यासाठी दरमहा १,००० मेसेजेस मोफत मिळतील. ही मर्यादा संपल्यानंतर पुढील प्रत्येक मेसेजसाठी शुल्क आकारले जाईल.

 

आतापर्यंत ग्राहकाचा मेसेज आल्यानंतर २४ तासांच्या आत दिले जाणारे युटिलिटी मेसेजेस मोफत होते. मात्र, १ ऑक्टोबरपासून या मेसेजेससाठीही कंपन्यांना १४ पैसे प्रति मेसेज या दराने पैसे द्यावे लागतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -