HomeTechnology & gadgets6 ऑक्टोबरला ऑटोमोबाईल बाजारात मोठा धमाका! एकाच दिवशी 2 कार आणि 4...

6 ऑक्टोबरला ऑटोमोबाईल बाजारात मोठा धमाका! एकाच दिवशी 2 कार आणि 4 बाईक होणार लॉन्च

ऑक्टोबर महिन्यात भारतीय ऑटोमोबाईल बाजारात वाहनप्रेमींसाठी मोठी पर्वणी पाहायला मिळणार आहे. 6 ऑक्टोबर 2026 रोजी एकाच दिवशी तब्बल सहा नवीन वाहनांचे लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन कार आणि चार मोटारसायकलींचा समावेश आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

स्कोडा स्लाविया फेसलिफ्ट

स्कोडा आपल्या लोकप्रिय स्लाविया सेडानचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणणार आहे. नव्या मॉडेलमध्ये बाह्य डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन हेडलाईट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड एलईडी लाईट बार, नवीन अलॉय व्हील्स आणि अपडेटेड टेललाईट्स यामुळे कारला अधिक आकर्षक लूक मिळण्याची शक्यता आहे.

केबिनमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळू शकते. इंजिनमध्ये मोठा बदल अपेक्षित नसून 1.0 आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय कायम राहण्याची शक्यता आहे.

होंडा एलिव्हेटचे नवे रूप

होंडाची लोकप्रिय एसयूव्ही एलिव्हेटही 6 ऑक्टोबरला अपडेटेड अवतारात दाखल होण्याची शक्यता आहे. नवीन हेडलाईट्स, ग्रिल, बंपर, अलॉय व्हील्स आणि टेललाईट्समध्ये बदल अपेक्षित आहेत.

इंटीरियरमध्ये 10.25 इंचाचे इन्फोटेनमेंट युनिट, वायरलेस चार्जिंग, ऑडिओ सिस्टम आणि कनेक्टेड कार फीचर्ससारख्या सुविधा मिळू शकतात.

ट्रायम्फच्या चार बाईक

या दिवशी ट्रायम्फ मोटरसायकल्सकडून तब्बल चार नवीन मॉडेल्स सादर केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये Bonneville 400 या बहुप्रतीक्षित रेट्रो-स्टाइल मोटारसायकलीचा समावेश असल्याची चर्चा आहे.

याशिवाय Street Triple आणि Tiger मालिकेतील दोन मॉडेल्सही सादर होण्याची शक्यता आहे. Bonneville 400 ची स्पर्धा Royal Enfield Classic 350, Bullet 350 आणि Honda CB350 सारख्या बाईक्सशी होऊ शकते.

एकाच दिवशी सहा वाहनांचे लॉन्चिंग झाल्यास भारतीय ऑटोमोबाईल बाजारात स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम किंमत, फीचर्स आणि उपलब्धतेची अधिकृत माहिती लॉन्चवेळी स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -