Thursday, July 24, 2025
Homeमनोरंजनचक्क करीना कपूर खान पुणे पोलिसांची झाली फॅन

चक्क करीना कपूर खान पुणे पोलिसांची झाली फॅन

कोरोनाने संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस सातत्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मास्क घालण्याबाबत जागरूक करताना देखील दिसत आहेत. अलीकडेच पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घालण्यासाठी आणि कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे.

पुणे पोलिसांच्या अनोख्या पद्धतीवर अभिनेत्री करीना कपूर खान देखील खुश झाली आहे. इतकेच नव्हेतर चक्क करीनाने पुणे पोलिसाचा मास्कच्या जनजागृतीचा एक खास व्हिडीओ शेअर करत पोलिसांचे काैतुक केले आहे. करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक पोलीस ‘ए भाई जरा देख के चलो’ हे गाणे म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी एका खास पध्दतीने गाणे म्हणताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -