दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पांघरुण हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले आहेत. झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात पहायला मिळेल.
पांघरुण चित्रपट जरी अजून प्रदर्शित झाला नसला तरी त्याची गाणी मात्र तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतील. या गाण्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच सिनेरसिकांच्या मनात घर केलंय. ‘ही अनोखी गाठ कोणी बांधली’, ‘सतरंगी झाला रे’, ‘इलुसा हा देह’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
या सिनेमाने अनेक पुरस्कार प्राप्त केलेत. यातली गाणी मनाला मोहिनी घालताहेत. 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, पाहणं महत्वाचं असेल.