दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपला दमदार अभिनय आणि आवाजाची जादू करणारी अभिनेत्री श्रुती हसनचा आज वाढदिवस आहे. बॉलीवूडमधील चित्रपट असो की टॉलिवूड, कॉलिवूड चित्रपटात ऍक्टिव्ह राहिलेल्या श्रुतीचा 28 जानेवारी 1986ला जन्म झाला. तामिळनाडूच्या चेन्नई येथे जन्मलेल्या श्रुतीच्या वडिलांचे नाव कमल हसन असून ते कॉलिवूडसह बॉलीवूडचे नावाजलेले अभिनेते आहे. ‘दिल तो बच्चा है जी’, ‘वेलकम बॅक’, ‘रमय्या वस्तावय्या’ आणि ‘गब्बर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी श्रुती हसन आपल्या खाजगी आयुष्यामुळे अनेकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. श्रृती हसनच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्याबद्दल काही रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत…
श्रुतीने आपल्या गायनाचे शिक्षण कॅलिफोर्निया येथील म्युजिशियन इन्स्टिट्यूट येथून घेतले.श्रुतीने आपल्यआ सिंगिंग करिअरची सुरूवात वयाच्या सहाव्या वर्षी केली होती.
‘लक’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री सारिका दोघे लिव्ह इन रिलेशनशिप राहत होते. त्यावेळी सारिका गर्भवती राहिली आणि तिने श्रुतीला जन्म दिला.
श्रुती जेव्हा शाळेत होती तेव्हा तिने आपले नाव लपवीत खोट्या नावाने आपले शिक्षा पूर्ण केले. तिने आपले नाव पूजा रामचंद्रन असे ठेवले होते. जेणे करून कोणाला लक्षात येणार नाही.
श्रृती ही कमला हसन आणि सारिका ठाकूर यांची मोठी मुलगी आहे. या माय-लेकींनी बरेच दिवस एकामेकांशी बोलत नव्हत्या.
.