नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ( 3-2 असा पराभव केला. मालिकेतील शेवटच्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 17 धावांनी पराभव केला. हा विजय वेस्ट इंडिजच्या संघासाठी बुस्टर डोस ठरणार आहे. भारत दौऱ्याआधी निश्चित त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. या मालिका विजयानंतर कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले सर्व लक्ष आगामी भारत दौऱ्यावर केंद्रीत केलं आहे. “कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास मी खूपच उत्सुक्त आहे. माझ्यासाठी हे विशेष असेल” असं पोलार्डने म्हटलं आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका सुरु होणार आहे.
“इंग्लंड विरुद्ध चांगला विजय मिळवला. आता भारत दौऱ्यात अशाच पद्धतीचा सकारात्मक खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास आम्ही उत्सुक्त आहोत. आमच्यासाठीही ही विशेष सीरीज आहे” असे पोलार्ड इंग्लंडला पराभूत केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.