Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी नगरसेवक दीपक जयस्‍वाल यांच्या कारला अपघात

माजी नगरसेवक दीपक जयस्‍वाल यांच्या कारला अपघात

नागपूर – चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथील पेट्रोलपंपा समोर महानगरपालिकेचे माजी नगसेवक दीपक जयस्वाल यांच्या कारला अपघात झाला. ते नागपूर वरून चंद्रपूरकडे जात होते. हा अपघात आज (दि. ३१) दुपारी दाेन वाजण्याच्या सुमारास घडला.

दीपक जयस्वाल हे कारने नागपूर वरून चंद्रपूरकडे जात होते. टेमुर्डा येथील पेट्रोलपंपाजवळ समोरून अचानक टीप्पर आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार रस्ता दुभाजकाला धडकून दुसऱ्या एका दुचाकीला धडकली. दीपक जयस्वाल यांना किरकाेळ दुखापत झाली. तर कारचालक उद्धव बन्सोड यांना डोक्याला दुखापत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -