Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरयंत्रमागाची वीज सवलत बंद होणार नाही

यंत्रमागाची वीज सवलत बंद होणार नाही

27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीज बिलात सुरू असलेली सवलत यापुढेही कायम राहील. कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे ठोस आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिले. त्याचबरोबर यासाठी सुरू केलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ तर करूच, पण 75 पैशांच्या सवलत योजनेचा एक महिन्याच्या आत निर्णय करू, असेही सांगितले. इचलकरंजीतील संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. ना. शेख म्हणाले, कोरोनाच्या संकटातही राज्य शासनाने अनुदानावर 2200 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही अनुदानाच्या योजना बंद होणार नाहीत. वस्त्रोद्योग धोरण ठरवताना सर्व घटकांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांच्या समस्या, सूचना यांचा विचार करून अधिकार्‍यांशी चर्चा करूनच वस्त्रोद्योगाचे नवीन धोरण ठरवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एकाही यंत्रमागाचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, असे ठाम आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. ते म्हणाले, शासनाला लोकहिताचा विचार करताना नियमांचाही विचार करावा लागतो. वस्त्रोद्योगाचा विस्तार आणि वस्त्रोद्योगाला बळ देण्यासाठी मंत्री शेख प्रयत्न करीत आहेत.खासदार धैर्यशील माने म्हणाले, उद्योजकांनी ऑनलाईन माहिती देणे गरजेचे आहे. सध्या महावितरण आणि यंत्रमागधारक यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वीज दर सवलत पूर्ववत करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -