Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगअविवाहित राहिलेल्या लतादीदींची एकूण संपत्ती आहे तरी किती ?

अविवाहित राहिलेल्या लतादीदींची एकूण संपत्ती आहे तरी किती ?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या आठ दशकांपासून प्रदीर्घ काळ रसिकमनावर आपल्या अवीट, दैवी सुरांनी अधिराज्य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर तथा लतादीदी यांचे काल महानिर्वाण झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आणि एक अमर, अमृत स्वरयात्रा कायमची विसावली. त्यांच्या निधनाने रसिकश्रोते, चित्रपटसृष्टी आणि संगीतसृष्टीवर वज्राघातच झाला असून, त्यांच्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. लतादीदींच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड शोकाकुल समुदाय उपस्थित होता. या शोकसागरात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आवर्जून उपस्थित राहिले.

लता मंगेशकर यांच्या शेवटचा विलचेअर वरील व्हिडिओ पाहिला का ? डोळे पाणावतील तुमचे



लता मंगेशकर यांना गायनाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाल्या होत्या. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर गायनास सुरुवात केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीला १३ व्या वर्षी प्रारंभ केला. चार भावंडामध्ये त्या सर्वांत मोठ्या असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. तब्बल सात दशकांमध्ये त्यांनी तब्बल ३६ हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती आहे तरी किती अशी चर्चा होऊ लागली.

लतादीदी यांनी आपल्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान व्यावसायिक कारकिर्दीमध्ये कोट्यवधी रुपयांची कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार लता मंगेशकर यांची संपत्ती ३६८ कोटी रुपयांची आहे. त्यांच्या संपत्तीमधील अधिकतर हिस्सा त्यांच्या गाण्याच्या रॉयल्टीमधून येतो. याचबरोबर त्यांनी गुंतवणूक केली होती. मात्र, एवढी संपत्ती असतानाही त्यांनी आपला साधेपणा कधीच सोडला नाही.

लता मंगेशकर यांचे साउथ मुंबईमध्ये पेडर रोडवर प्रभाकुंज निवासस्थान आहे. त्या ठिकाणीच त्या राहिल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार यांना कारची सुद्धा आवड होती. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांची कार आहेत. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीमध्ये वीर झारा च्या प्रदर्शनानंतर निर्माता यश चोप्रा यांनी त्यांना मर्सिडीज कार गिफ्ट केली होती.

भारतीय रसिकांवर सुमारे पाऊण शतकाहूनही अधिक काळ आपल्या स्वर्गीय सुरांची मोहिनी घालणार्‍या भारतरत्न लता मंगेशकर यांचा श्‍वास अखेर रविवारी थांबला. 29 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. या काळात त्या बर्‍या होतील, त्यांच्याबाबत काही अप्रिय वृत्त कानावर येऊ नये, अशी प्रार्थना तमाम भारतवासीय करत होते; पण ती बातमी धडकलीच. सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लतादीदींनी ब्रीच कँडी रुग्णालयात शेवटचा श्‍वास घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -