Friday, March 14, 2025
HomeबिजनेसShare market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही ‘रॉकेट'

Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही ‘रॉकेट’

देशांतर्गत शेअर बाजाराने मंगळवारी ट्रेडिंगला जोरदार सुरुवात केली, व्यापार सुरू होताच बाजार 0.60 टक्क्यांनी वधारला आणि सुरुवात होण्यापूर्वी वाढीचे संकेत दिले. आज बीएसई (BSE) सेन्सेक्स आणि एनएसईचा (NSE) निफ्टी दोन्ही नफ्यात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजार सुरू होण्यापूर्व सत्रात सेन्सेक्सने 350 हून अधिक अंकांची झेप घेतली आणि 58 हजारांचा टप्पा ओलांडला. बाजार उघडल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली, पण सेन्सेक्स जवळपास 330 अंकांनी वधारून 58,100 अंकांच्या पुढे झेपावला. व्यापाराच्या अल्प कालावधीनंतर एकदा जबरदस्त तेजी दिसून आली. या तेजीने पाचशेचा टप्पा ओलांडला. निफ्टी 0.65 टक्क्यांनी वधारून सुमारे 17,380 अंकांवर पोहचला होता. सिंगापूरचा निर्देशांक एसजीएक्स (SGX Nifty) चार परिणाम पूर्णपणे देशांतर्गत बाजारात दिसून आला. बाजार सकारात्मक राहण्याची संकेत मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -