हिजाबबाबत दाखल केलेल्या याचिकेववर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील दहावीपर्यंतच्या सर्व शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले. मंगळूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पहिलीपासूनच्या शाळांना सुट्टी देण्यात आली नव्हती. हे वर्ग नियमितपणे सुरू आहेत. नववीपासून पदवीपर्यंतच्या सर्व वर्गांना सुट्टी देण्यात आली होती. न्यायालयाने शैक्षणिक कामकाज, वर्ग नियमितपणे सुरू करण्याची सूचना दिली आहे.
त्यामुळे टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत. सुरुवातीला नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. न्यायालयाच्या निकालानंतर पदवीपूर्व आणि इतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता सर्व जिल्हा शिक्षणाधिकार्यांची कॉन्फरन्स बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला जाईल. सर्व जिल्हाधिकार्यांशी संपर्कात आहे. रोज प्रत्येक जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली जात असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.