ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रेमाचा महिना सुरू झाला आहे. “लव्ह बर्डस”साठी हा महिना खूप खास आहे. १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतात. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. सुरूवातीला गुलाब, चॉकलेट यांसारखे लहान गिफ्ट दिले जातात. पण व्हॅलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तसतसे लोकांना आपल्या पार्टनरला काय गिफ्ट द्यावे हा प्रश्न पडतो. प्रत्येकाला काही ना काही खास गिफ्ट द्यायचे असते, ज्यामुळे पार्टनर खूश होईल. पण काय गिफ्ट द्यायचे हे समजत नाही. मुलींकडे बॉयफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण मुलींना काय गिफ्ट द्यावे, त्यांना काय आवडेल हे मुलांना कळत नाही. मुलींना शक्यतो ट्रेंडिंग वस्तू आवडतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठीचे असे पर्याय सांगणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुमचा पार्टनर खूश होईल. तसेच, या वस्तू त्यांना दीर्घकाळ वापरता येतील.
वॉच/ स्मार्ट वॉच
घड्याळे सगळ्यांनाच आवडतात. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे असतात. परंतु घड्याळांमध्ये नेहमी नवनविन मॉडेल, स्पेशल एडिशन येत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पार्टनरला स्मार्टवॉच किंवा नुकतेच लॉंच झालेले घड्याळ भेट देऊ शकता. त्यांना ते खूप आवडेल आणि दिर्घकाळ वापरता येईल.
• इयरपॉड
सध्या तरूणाईमध्ये इयरपॉडची प्रचंड क्रेझ आहे. विविध ब्रॅंडचे आणि तुम्हाला हव्या त्या किंमतीत इयरपॉड मिळतील. १ हजार रूपयांपासून इयरपॉड बाजारात उपलब्ध आहेत. हे गिफ्ट तुमच्या पार्टनरसाठी अतिशय उपयोगी असेल.
जर तुमचा पार्टनर फिटनेस फ्रिक असेल, तो त्याच्या आरोग्याची काळजी घेणारा असेल तर तुम्ही त्यांना फिटनेस बँड भेट देऊ शकता. मार्केटमध्ये 1,500 रुपयांपासून चांगले फिटनेस बँड उपलब्ध आहेत. तुमच्या पार्टनरसाठी हे अतिशय उपयुक्त गिफ्ट ठरू शकते.
मोबाइल कव्हर
तुम्ही सुंदर रंगीबेरंगी किंवा क्रिस्टल मोबाईल कव्हर देखील भेट देऊ शकता. विशेषतः मुलींना रंगीबेरंगी आणि चमकणारे कव्हर खूप आवडतात. त्यातच सध्या कस्टमाइझ कव्हर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यावर तुम्ही खास मेसेज किंवा स्वतःचा फोटो असलेले कव्हर बनवून घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे या कव्हर्सची किंमतही कमी असते.
• मेकअप किट
तुमच्या गर्लफ्रेंडसाठी मेकअप किट हा सर्वात उत्तम पर्याय असेल. सर्वच मुलींना मेकअप करायला आवडते. त्यामुळे मेकअपचे सर्व साहित्य असलेला एकच मेकअप किट गिफ्ट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे पाहून तुमची गर्लफ्रेंड खूप खुश होईल.
लेटेस्ट ज्वेलरी
मुलींना दागिण्यांची खूप आवड असते त्यामुळे जर तुमचे बजेट जरा जास्त असेल तर तुम्ही लेटेस्ट लॉंच झालेले कानातले, नोजरींग, पेंडन्ट, ब्रेसलेट असे लहान लहान दागिणे गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट तुमच्या गर्लफ्रेंडलच्या नेहमी लक्षात राहील.
तुम्ही या सर्व गोष्टी बाजारातून प्रत्यक्ष खरेदी करू शकता तसेच ऑनलाइनही ऑर्डरही करू शकता.
व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या पार्टनरला द्या हे गिफ्ट्स; पहा काय आहे ट्रेंडिंग
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -