Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगसोन्याची 50 हजारी घौडदोड : महाराष्ट्रात सोनं महागलं; आजचे भाव काय?

सोन्याची 50 हजारी घौडदोड : महाराष्ट्रात सोनं महागलं; आजचे भाव काय?

ताजी बातमी ऑनलाइन टीम

सोन्याच्या भावात घौडदोडीचे सत्र कायम आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आज (मंगळवारी) सोन्याच्या भाव पन्नास हजारांच्या पलीकडे कायम राहिला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या भावात सरासरी 100 रुपयांची भाववाढ दिसून आली. राजधानी मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46400 व 24 कॅरेट सोन्याला 50620 रुपये भाव मिळाला. सोन्यानं पन्नास हजारांचा टप्पा पार केल्याने सोने गुंतवणुकीची (GOLD INVESTOR) आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची भाववाढ दिसून येत आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता (SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडी यामुळे गुंतवणुकदारांत अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीकडे अनेकांनी आपला मोर्चा वळविला आहे. आगामी काही दिवसांत भाववाढ कायम राहील अशा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील
आजचे ताजे भाव-
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :
• मुंबई- 50,620 रुपये

• पुणे- 50,550 रुपये

• नागपूर- 50,610 रुपये

• नाशिक- 50,550 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):
• मुंबई- 46,400 रुपये

• पुणे- 46,350 रुपये

• नागपूर- 46,400 रुपये

• नाशिक- 46,350 रुपये

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -