Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगदुर्दैवी! कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू

दुर्दैवी! कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू

कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अवजड वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोन विद्यार्थ्यांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील कडाचीवाडी हद्दीत घडली आहे. यामध्ये तन्मय पंकज हरगुडे  (वय-18 रा. साबळेवाडी, ता. खेड) व ओंकार कैलास साबळे (वय-18 रा. बहुळ ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. या घटनेमुळे साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे.

हा अपघात चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील कडाचीवाडी हद्दीत सायंकाळी तीनच्या सुमारास झाला. तन्मय व ओंकार कॉलेजमधून आपल्या दुचाकीने घरी जात होते. कडाचीवाडी हद्दीत पाठिमागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तन्मयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -