Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्र१७ वर्षीय मुलाचा  १० लाखांच्या खंडणीसाठी गळा दाबून खून

१७ वर्षीय मुलाचा  १० लाखांच्या खंडणीसाठी गळा दाबून खून

दहा लाखाच्या खंडणीसाठी मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतात उघडकीस आली. आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. चेतन नरेश खोब्रागडे (वय १७) रा. बनगाव ता. आमगाव असे मृत मुलाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चेतन खोब्रागडे हा मोठ्या आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी येथे निघाला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. बोदा येथील शेतात असलेल्या तणच्या ढिगाऱ्यात मृतदेह ठेवला होता. त्याची चप्पल तणसाच्या ढिगाऱ्याच्या बाहेर मिळाली. त्या चप्पलजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तणसच्या ढिगार्यात शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळला. चेतन हा आयटीआय मध्ये शिकत होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -