सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर डीआरडीओमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. अॅप्रेंटीस भरतीसाठी डीआरडीओ नोटिफिकेशन जारी केले आहे. एकूण 17 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची बी.ई, बी.एससी, बी.टेक, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, किंवा इतर पदवी असणे गरजेचे आहे.
अधिकृत वेबसाईट https://rac.gov.in/
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव – अॅप्रेंटीस
पदाची एकूण संख्या – 17
श्रेणी – केंद्र सरकारची नोकरी
अर्ज प्रक्रिया सुरु – 16 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 3 मार्च 2022
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना 8000 ते 9000 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.
शैक्षणिक पात्रता…
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बी.ई, बी.एससी, बी.टेक, डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रातील पदवीधर असावा. तसेच पदवी मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची असावी. अधिक माहितीसाठी पात्र उमेदवारांनी DRDO च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)