ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोनी मराठी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळत आहे.
श्रीवल्ली हे ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाणं सध्या तुफान गाजतंय. सिड श्रीरामने हे गाणं गायलं आहे.
नुकतीच सिडने इंडियन आयडल मराठीच्या मंचावर हजेरी लावली असून त्याने यावेळी गाणंसुद्ध सादर केलं.
प्रेक्षकांना हा एपिसोड येत्या 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.
या एपिसोडमध्ये अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीसमोर सिडने गाणं सादर केलं. मराठी कार्यक्रमाचं आदरातिथ्य घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा खुश झाला.
सिड श्रीरामने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत.