जगभरात महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील जळगाव शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. फेशिअल करण्यासाठी नराधमाने पीडित महिलेला हॉटेलमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Rape) केला. नंतर नराधमाने मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ देखील शूट केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश प्रकाश चौधरी (वय-48, रा. तुळजाई नगर, जळगाव) असे नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपीची आधीपासून ओळख होती. दोघे इन्स्टाग्रामवर एकमेकांना प्रथम भेटले. त्यानंतर आरोपीने या ओळखीचा फायदा घेत पीडित महिलेला फेशिअल करण्याच्या बहाण्याने शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर नराधमाने त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचा अश्लील व्हिडिओ देखील शूट केला. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल (Blackmail) केले. तिच्याकडे 50000 रुपयांनी मागणी केली होती, अशी माहिती रामानंद नगर पोलिसांनी दिली.
आरोपी गणेश चौधरी आणि पीडित महिलेची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने महिलेसोबत मैत्री वाढवली.
गेल्या जानेवारी महिन्यात आरोपी गणेश यानं महिलेला डी मार्ट मॉल परिसरात बोलावून तिला स्मार्टफोन गिफ्ट केला होता. तसेच मला लग्नाला जायचं आहे. माझं फेशिअल करुन देशिल का? असे विचारले होते. त्यावर पीडितेने होकार दिला होता. याचाच फायदा घेत आरोपीने फेशिअल करण्याच्या बहाण्याने पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावले. हॉटेलमधील एका रुममध्ये आरोपीने पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर देखील आरोपीने पीडितेला बॅकमेल केले. पीडितेने अखेर पतीला आपबिती सांगितली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी गणेश चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.