सोन्याचा दरात आज वाढ झाली आहे. आज 8 मार्च 2022रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.3% वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,532 रुपये झाली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील 0.38 टक्क्यांनी वाढ झाली असून 70,235 रुपये किलोवर पोहोचले.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज
49,400 तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,890 रुपये आहे. रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी दरात लक्षणीय दरवाढ पाहायला मिळत आहे तसेच उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.