भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहाणाऱ्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. मध्ये रेल्वे विभागात भरती सुरू झाली आहे. ज्यूनिअर टेक्निकल एसोसिएट पदासाठी नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर मध्य रेल्वेने रिक्त झालेल्या 20 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देखील काढली आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार ज्यूनिअर टेक्निकल एसोसिएट पदासांठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च आहे. उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात.
इच्छूक उमेदवार मध्ये रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2022
अधिकृत वेबसाइट : cr.indianrailways.gov.in.
ऑफलाइनन अर्ज करता येईल.
पदांची संख्या : 20
काय आहे पात्रता
शैक्षणिक योग्यता :
> अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. ( BE/ डिप्लोमा/ B.Sc (सिव्हिल इंजीनियरिंग)
– उमेदवार अधिकृत वेबसाइट वेबसाइट : cr.indianrailways.gov.in वरून अधिक माहिती घेऊ शकतात.
वयोमर्यदा:
– अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वर 18 ते 33 वर्षे असावे. ओबीसी श्रेणीतील उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षे असावे. तर SC/ ST श्रेणीतील उमेदवाराचे वय देखील 18 ते 38 वर्षे असावे.
कशी होईल निवड?
– लेखी परीक्षा
– इंटरव्यू
अर्ज शुल्क:
– SC/ ST/ OBC/महिला/अल्पसंख्यक/ EWS श्रेणी: 250 रुपये.
– जनरल उमेदवारांसाठी : 500 रुपये.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)