शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर (bjp) टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ईडी सत्रावर भाष्य करताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलं आहे, असं संजय राऊतांनी म्हणत तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केलाय. तर याचवेळी राऊतांनी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक दावाही पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, भाजपनं विजय मिळवलेल्या उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यांतील विजयाचा उन्माद मांडून नये, असं सांगायलाही राऊत विसरले नाही. गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते,असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केलीय.
आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र यावे : मंत्री भुजबळ यांचे आवाहन
राज्यातील महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारमधील द्वंद सर्वश्रृत आहे. आता यावर रोज राजकीय आरोप प्रत्यारोप, टीका- टिप्पणी राजकीय नेते करत असतात. महाविकास आघाडीमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ यांच्यावर झालेली ईडी कारवाई असो वा राज्यातील ईडी सत्र, यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊतांनी एक महत्वाचं विधान केलंय. तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केलाय. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते असल्याचंही राऊत यावेळी म्हणालेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून ते अवघ्या देशाचे पंतप्रधान आहे. मोदी हे एका पक्षाचे नेतृत्व करतायेत. ते देशाचे पंतप्रधान आहे, भाजपचे नाही, असा खोटक टोलाही संजय राऊतांनी पंतप्रधानांना यावेळी लगावलाय.