Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगउन्हाळ्याची चाहूल लागताच चिकन-अंड्याचे दर वधारले, नेमके कारण काय?

उन्हाळ्याची चाहूल लागताच चिकन-अंड्याचे दर वधारले, नेमके कारण काय?

एकीकडे राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना दुसरीकडे  चिकन आणि अंडी ही महागले आहेत. गतआठवड्याच्या तुलनेत चिकनच्या दरात 40 रुपयांनी वाढ झालेली आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच असेही चिकनचे दर वाढतात मात्र, यंदा दरवाढीचे प्रमाण हे अधिक आहे. उन्हाळ्यामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये   पाण्याची टंचाई निर्माण होते शिवाय पक्ष्यांचे खाद्य यांचेही वाढलेले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून गतआठवड्यात बॉयलर चिकन हे 220 रुपये किलो होते तर तेच आता 260 रुपयांवर पोहचलेले आहे. वाढत्या दरामुळे व्यवसायिकांसह ग्राहकही त्रस्त आहेत. मात्र, भविष्यातही दर वाढतीलच असा अंदाज व्यापऱ्यांनी व्यक्त केला आहे. चिकनबरोबरच अंड्याच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र नाशिकच्या बाजारपेठेत पाहवयास मिळत आहे.

उन्हाळ्यात चिकन, अंड्यासह मटणाचेही दर वाढतात. पण यंदा केवळ चिकन आणि अंड्याच्या दरात वाढ झाली असून मटण हे 660 रुपये किलोवर स्थिर आहे. उन्हाळ्यात पोल्ट्री फार्ममध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. पाणीपुरवठा आणि धान्याचा पुरवठा करताना पोल्ट्रीधारकांचा अधिकचा खर्च होत आहे. त्याचाच परिणाम चिकन आणि अंड्यावर झालेला आहे. मध्यंतरी पोल्ट्रीफार्म धारकांकडून पशूखाद्यासाठी आवश्यक असलेल्या गहू आणि तांदळाच्या दरात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. धान्य महाग होत असतानाच पोल्ट्रीधारकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळेच दरात वाढ झाली आहे.

राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणामही दरवाढीवर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच प्रमाणे उन्हाळ्यामध्ये असे देखील वाढणारे चिकनचे दर ,यामुळे आता सर्वसामान्य चिकन व्यवसायिक चांगलेच वैतागले आहेत.. गेल्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक मध्ये चिकन प्रति किलो 40 रुपयांनी महाग झालाय तर अंड्यांचे दर देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेत वधारल्याचे चित्र बाजारात बघायला मिळत आहे.

गत आठवड्यात बॉयलर चिकन 220 रुपये किलो होते तर मंगळवारी 260 रुपये किलो. गावठी चिकनच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. गतआठवड्यात 150 तर या आठवड्यात 180 रुपये दर झाले आहेत. जिवंत कोंबडी गतआठवड्यात 120 तर चालू आठवड्यात 170 रुपायांना मिळत आहे. तर दुसरीकडे 1 डझन अंड्यामागे 5 रुपये दरवाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -