सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जात आहे. घरोघरी गुलाल, रंग, पिचकारी हातात घेत लोक हा सण साजरा करत आहेत. रंगांच्या या सणावर संपूर्ण देश वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद साजरा करतो.
सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत हा सण मोठ्या थाटामाटात पार पडतो. ठिकठिकाणी होळीची गाणी वाजवली जात आहेत.
पण त्यातही असेही काहीजण आहेत जे होळी खेळत नाहीत. अनेक बॉलिवूड कलाकारांचा ही यात समावेश आहे. ज्यांना होळी खेळायला आवडत नाही.
अनेक सेलिब्रिटींना असे वाटते की, यामुळे वायु प्रदूषण होते, पाण्याचा अपव्यय होतो. तसंच रंगांमुळे त्वचेची ऍलर्जी होते, काहीजण प्राण्यांना देखील त्रास देतात, त्यामुळे त्यांना रंगपंचमी खेळायला आवडत नाही.
चित्रपटातील सीनसाठी या सेलिब्रिटींनी रंगपंचमीचा सण साजरा केला असला तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते हा सण साजरा करण्याचे टाळताना दिसत आहेत.
‘गली बॉय’ फेम अभिनेता रणवीर सिंगने एका कार्यक्रमात सांगितले होते की, त्याला होळी खेळायला आवडत नाही. त्याला OCD ची समस्या आहे, ज्यामध्ये व्यक्ती फक्त स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करतो. रणवीरला खूप असामान्य कपडे घालायला आवडत असले तरी त्याला होळीचे रंग आवडत नाहीत.
जॉन अब्राहम याला देखील होळी खेळायला आवडत नाही. 2016 मध्ये एका मुलाखतीत जॉनने सांगितले होते की, त्याला होळी खेळायला आवडत नाही, कारण त्याने अनेकांना त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना पाहिले आहे.
‘लाल सिंह चड्ढा’ फेम करीना कपूर खानने एकदा सांगितले होते की, राज कपूर यांच्या निधनानंतर तिने होळी खेळणे बंद केले होते. बॉलिवूडमध्ये राज कपूर होळीच्या दिवशी मोठमोठ्या पार्ट्या करायचे. याशिवाय करीना होळी खेळणे टाळते, कारण होळीचे रंग तिच्या केसांचा रंग खराब करतात.
अर्जुन कपूरनेही होळी खेळणे बंद केले होते. एका मुलाखतीत, अभिनेता म्हणाला की तो 17-18 वर्षांच्या वयापर्यंत होळी खेळला होता. यानंतर त्याला रंगांची अॅलर्जी होऊ लागली, याच कारणामुळे त्याने होळी खेळणे बंद केले.
होळीला ‘बलम पिचकारी’ हे गाणे जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत सणाचा उत्सव अपूर्ण वाटतो. या हिट गाण्यात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळला.
दोघांची केमिस्ट्री आणि हे गाणं खूप गाजलं. आजही होळी निमित्त आयोजित कार्यक्रमांना हे गाणं वाजत. पण या गाण्यात होळी खेळताना दिसणाऱ्या रणबीर कपूरला खऱ्या आयुष्यात होळी खेळायला अजिबात आवडत नाही. रणबीर कपूरने हा सण पूर्णपणे टाळणे पसंत केले आहे.
चित्रपट निर्माता करण जोहरलाही होळी खेळायला आवडत नाही. 2012 मध्ये करण जोहरने एका ट्विटमध्ये म्हटले होते की, तो 10 वर्षांचा असताना कोणीतरी त्याच्यावर होळीच्या दिवशी सडलेली अंडी फेकली. तेव्हापासून तो रंगपंचमीचा सण साजरा करत नाही