Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनगोविंदाच्या प्रेमात पडली होती राणी मुखर्जी, पण 'या' कारणामुळं तुटलं दोघांचं नातं!

गोविंदाच्या प्रेमात पडली होती राणी मुखर्जी, पण ‘या’ कारणामुळं तुटलं दोघांचं नातं!

आपले सौदर्य, दमदार अभिनय आणि सुंदर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा आज वाढदिवस आहे. 21 मार्च 1978 रोजी मुंबईत जन्मलेली राणी मुखर्जी तिच्या बॉलीवूड कारकिर्दीत भारतातील सर्वात हाय प्रोफाईल आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 2000 मधली सर्वात महागडी अभिनेत्री मानली जाणारी राणी मुखर्जीने अनेकदा आपले वैयक्तिक आयुष्य कॅमेरापासून दूर ठेवले आहे. राणी मुखर्जीचे अभिनेता गोविंदासोबत अफेअर राहिले आहे. त्यांच्या अफेअरसंबंधिच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. आज राणी मुखर्जीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि गोविंदाच्या अफेअरबद्दलच्या आणि त्यांचे नातं का तुटलं या मागच्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

2000 साली गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचा पहिला चित्रपट ‘हद करदी आपने’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर गोविंदा आणि राणीची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. रिपोर्टनुसार, या जोडीला जेवढे प्रेक्षक पसंत करत होते, तेवढेच दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. रील लाईफमधील ही जोडी रिअल लाईफमध्ये सुद्धा खूप जवळ आली होती. या जवळच्या नात्यामुळे गोविंदाचे वैवाहिक आयुष्यही ब्रेकअपच्या मार्गावर आले होते. त्या दिवसांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, गोविंदा आणि राणी एकत्र राहू लागले होते आणि गोविंदाने राणीला एक मर्सिडीज कार सुद्धा गिफ्ट दिली होती.

गोविंदा आणि राणीच्या वाढत्या जवळकीमुळे गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने गोविंदाला आपल्या दोन मुलांसह सोडले. सुनीताने राणीला गोविंदापासून दूर राहण्याची धमकीही दिली होती, असे सांगण्यात येते. सुनीताला सोडून जाणे गोविंदासाठी इतके सोपे नव्हते कारण गोविंदाची सर्व मालमत्ता सुनीताच्या नावावर होती. गोविंदा विवाहित आणि दोन मुलांचा बाप असल्याने राणीलाही काळजी वाटत होती. यामुळेच हे नातं पुढे जावं असे तिला वाटत नव्हते. या कारणांमुळे गोविंदा आणि राणी आपले नाते पुढे नेऊ शकले नाहीत.

तीन दशक चाहतांच्या मनावर राज्य करणाऱ्या राणी मुखर्जीने 2014 मध्ये फिल्ममेकर आदित्य चोप्रासोबत लग्न केले आणि 2015 मध्ये त्यांना आदिरा नावाची मुलगी झाली. राणी मुखर्जी ही आदित्य चोप्राची दुसरी पत्नी आहे. आदित्य चोप्राने 2000 मध्ये पायल खन्नासोबत लग्न केले होते. 2009 मध्ये दोघांनी लग्नाच्या 9 वर्षानंतर घटस्फोट घेतला होता. अशा परिस्थितीत जेव्हा राणी मुखर्जी आदित्य चोप्राच्या आयुष्यात आली तेव्हा आदित्य वैवाहिक होते आणि याच कारणामुळे राणीवर अनेकवेळा घर तोडल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्याचा राणी आणि आदित्यवर काहीही परिणाम झाला नाही आणि आदित्यने पायला घटस्फोट दिल्यानंतर राणी मुखर्जीने 2014 मध्ये त्याच्यासोबत लग्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -