ताजी बातमी ऑनलाईन टीम
बार मालकाने माजी नगरसेवकावर खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील आष्टा तालुक्यात ही घटना घडली आहे. हल्ला प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चौघांना अटक झाली आहे. नातेवाईकांची बदनामी करण्याच्या कारणावरुन हा राडा झाला होता. बार मालकाच्या टोळीने लोखंडी गज काठ्यांनी केलेल्या हाणामारीत माजी नगरसेवक संदीप तांबवेकर आणि त्यांचे बंधू प्रदीप तांबवेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील आष्टा तालुक्यात बार मालकाने नगरसेवकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
लोखंडी गज-काठ्यांनी मारहाण
नातेवाईकांची बदनामी केल्याच्या रागातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा आरोप आहे. बार मालकाच्या टोळीने लोखंडी गज-काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये माजी नगरसेवक संदीप तांबवेकर आणि त्यांचा भाऊ प्रदीप तांबवेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी संदीप तांबेकर यांनी सांगलीच्या आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी विशाल शिवाजी पवार, विश्वजीत उर्फ पोपट दिलीप गायकवाड, किरण निवृत्ती मस्के, संग्राम अर्जुन सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटरसायकल, लोखंडी गज जप्त करण्यात आले आहेत. तर आणखी चौघे जण फरार असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.