देशात तब्बल चाडेचार महिन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराचा भडका उडाला आहे. पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महागले आहे. वाढीव दर मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून (Fuel rates today) लागू झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96 रुपये 21 पैसे तर डिझेलचा दर 87 रुपये 47 पैसे झाला आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 110 रुपये 77 पैसे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 94 रुपये 94 पैसे इतका आहे. आधी पेट्रोल 109 रुपये 98 पैसे तर डिझेल 94 रुपये 14 पैसे प्रतिलिटर दराने विकले जात होते.
राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत 110 रुपये 53 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 93 रुपये 35 पैसे प्रतिलिटर आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्च तेल अर्थात क्रूड ऑईलचे दर गगनाला भिडले आहेत. क्रूड ऑईल प्रति बॅरेल 112 डॉलरवर पोहोचला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशात प्रत्येक शहरात पेट्रोल डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. इंधन दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसला आहे.