Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीतथ्यांच्या आधारावर तपास यंत्रणा कारवाई करत असते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

तथ्यांच्या आधारावर तपास यंत्रणा कारवाई करत असते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. यामध्ये फडणवीसांनी मुंबईत महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप देखील केला. मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांविषयी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी पक्षांवर आता देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून शिर्डीत बोलताना टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत, असे यावेळी फडणवीस म्हणाले. एवढी भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही पुराव्यानिशी मांडली. मुंबई महानगर पालिकेत कोरोनाच्या काळात कशी लूट झाली, याची उदाहरणे दिली. सत्ताधाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याची कुठलीच उत्तरे नसल्यामुळे त्यांनी भावनिक भाषण केले. ही त्यांची जबाबदारी आहे की या भ्रष्टाचाराचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी विधानसभेत कुटुंबीयांवर सुरू असलेल्या कारवाईवरून बोलताना टीका केली होती. फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. कुणाच्याही कुटुंबापर्यंत आम्हाला जायचे नाही. कोणतीही एजन्सी कोण कुणाचे नातेवाईक आहे हे बघून कारवाई करत नसते. तथ्यांच्या आधारावर कारवाई करत असते, असे फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -