Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनआरआरआर बघता न आल्यामुळे संतप्त चाहत्यांनी केली तोडफोड

आरआरआर बघता न आल्यामुळे संतप्त चाहत्यांनी केली तोडफोड

मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षक दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आरआरआर चित्रपटाचे रिव्ह्यू सोशल मीडियावर चाहते देत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याला आरआरआर चित्रपटातील सगळ्यात जास्त काय आवडले हे सांगत आहे. आरआरआर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्येच नाचत गाजत चित्रपट पाहिला त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आरआरआर या हॅशटॅगसोबत आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगण हे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

आरआरआर हॅशटॅगसोबत अनेक चाहत्यांनी चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. आरआरआरच्या थिएटरमधील एक क्लिप एका नेटकऱ्याने शेअर केली आहे. या क्लिपमध्ये, प्रेक्षक चित्रपटाचा खूप आनंद घेताना दिसत आहेत, तर काही चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्यानंतर नाचू लागतात. तर एका व्हिडीओत थिएटरची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे. आरआरआर हा चित्रपट काही तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण दाखवता आला नाही. तर चित्रपट बघता न आल्यामुळे चाहत्यांनी संतप्त होऊन तोडफोड केली.

राजामौलीच्या ‘आरआरआर’बद्दल अपेक्षा आहे की हा चित्रपट पहिल्या दिवशी कमाईचे नवे विक्रम करू शकतो. अॅडव्हान्स बुकिंगचे समोर आलेले आकडेही आश्चर्यचकित करणारे आहेत. या चित्रपटाने थिएटर राइट्समधूनही करोडोंची कमाई केल्याचे म्हटले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -