Thursday, December 18, 2025
Homeसांगलीसांगलीच्या भाजप नेत्यावर विनयभंग केल्याचा गंभीर आरोप..!

सांगलीच्या भाजप नेत्यावर विनयभंग केल्याचा गंभीर आरोप..!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

भाजपच्या सांगली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिराने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.


पीडित महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. त्या संशयित व्यक्तीला अटक करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम यांना निवेदन दिले आहे.

राजू कोरे हा भाजपा नेता आणि माजी सरपंच आहे. त्याची वहिनी ही जिल्हा परिषद अध्यक्ष असून त्यांच्या शासकीय बंगल्यात राजू कोरे याने अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, राजू कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणीही केली गेली आहे. त्याने अनेक महिलांच्याबाबत असे प्रकार केल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात राजू कोरे याच्यावर गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी राजकुमार कोरे याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसानी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -