Friday, July 4, 2025
Homeब्रेकिंगहिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा...

हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा

बापाने मुलाची जिवंत जाळून हत्या  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरु शहरात  हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला. खर्चाचे योग्य तपशील देऊ न शकल्यामुळे बापाने मुलाला केमिकल टाकून पेटवले. आगीत होरपळलेल्या 25 वर्षीय मुलाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सुरेंद्र असे आरोपी पित्याचे नाव असून त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. तर अर्पित असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. बापाने मुलाला पेटवल्याची घटना  परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?
बंगळुरुतील व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान अर्पितचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चामराजपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाल्मिकी नगर परिसरात गेल्या शुक्रवारी म्हणजे 1 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. उपचार सुरु असताना गुरुवारी अर्पितने अखेरचा श्वास घेतला.

ही घटना घडली त्यावेळी अर्पित दुकान चालवत होता. सुरेंद्रने त्याला जमाखर्च विचारला असता, दीड कोटी रुपयांचा हिशेब तो देऊ शकला नाही. त्यामुळे बापलेकामध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर सुरेंद्रने मुलाच्या अंगावर थिनर (रसायन) ओतले. त्यानंतर मुलगा रस्त्यावर गेला. तेव्हा बापही त्याच्या मागोमाग तिथे आला आणि त्याने माचिन काढून जळती काडी त्याच्या अंगावर फेकली.

अर्पितच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तो मदतीसाठी गयावया करु लागला. त्यानंतर तो रस्त्याने सैरावैरा धावत सुटला. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यामध्ये अर्पित 60 टक्के भाजला होता. त्याला स्थानिक नागरिकांनी व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केलं. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. सुरेंद्रच्या शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रला अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -