Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्र'ईठा'चे शूटिंग, श्रद्धा कपूर अंबाबाईच्या चरणी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

‘ईठा’चे शूटिंग, श्रद्धा कपूर अंबाबाईच्या चरणी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘ईठा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापुरात आली असून, तिने अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तिच्या आगमनाची माहिती मिळताच मंदिर परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी जमली.

 

श्रद्धाने शांतपणे दर्शन घेतले आणि चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

 

आगामी चित्रपट ‘ईठा’च्या शूटिंगमध्ये बिझी असलेल्या श्रद्धा कपूरने कोल्हापुरात आई अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत या चित्रपटातील अभिनेता रणदीप हुड्डा देखील होता. दोघांचे कोल्हापूरमधून व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

 

‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे ईठाचे दिग्दर्शन करत आहेत. यासाठी श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून ती विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विठाबाई यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटाची कहाणी आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापुरातील विविध ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं.

 

दरम्यान, श्रद्धाने कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी श्रद्धाच्या हातात खण-नारळाची ओटी होती. तिने आई अंबाबाईच्या चरणी ओटी वाहिली आणि दर्शन घेतले. यावेळी मराठी अभिनेता आनंद काळेदेखील उपस्थित होता. आनंद काळेने ‘संभाजी’ मालिकेत कोंडाजी फर्जंदची भूमिका साकारली होती.

यावेळी श्रद्धा कपूरने पीच कलर सूट परिधान केला होता. अत्यंत साध्या लूकमध्ये श्रद्धाला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तिने यावेळी हात उंचावून चाहत्यांना अभिवादन देखील केले.

 

दरम्यान, पायाला दुखापत झाल्यानंतर काही काळ चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतल्यानंतर सेटवर परतली होती. आता ‘ईठा’ चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. चित्रपटात श्रद्धा कपूरसह रणदीप हुड्डा, मोहम्मद झिशान अयुब यांच्या भूमिका आहेत.

 

कधी रिलीज होणार चित्रपट?

 

ईठा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२७ मध्ये रिलीज होईल, असे म्हटले जात आहे. या चित्रपटासाठी श्रद्धाने प्रचंड मेहनत घेतली आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेसाठी तिने खास मेहनत घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -