Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनसूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावणे विल स्मिथला पडले महागात, 'ऑस्कर'मध्ये १० वर्षे बंदी

सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावणे विल स्मिथला पडले महागात, ‘ऑस्कर’मध्ये १० वर्षे बंदी

ऑस्कर सोहळ्यात सूत्रसंचालक ख्रिस रॉक ( Chris Rock) याला कानशिलात लगावणे हॉलिवूड अभिनेता विल स्मिथला (Will Smith) महागात पडले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मोशन पिक्चर अकादमीने (Academy of Motion Picture) विल स्मिथला ऑस्कर अथवा इतर कोणत्याही अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास १० वर्षांसाठी बंदी घातली आहे.

स्मिथने केलेल्या कृतीनंतर अकादमीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने बैठक बोलावून त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर विल स्मिथवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ९४ वा ऑस्कर सोहळा (94th Oscars) हा आपल्या समाजातील अशा अनेक व्यक्तींचा उत्सव आहे ज्यांनी या गेल्या वर्षी अविश्वसनीय कार्य केले. पण, या सोहळ्याला स्मिथच्या कृत्याने गालबोट लागले. त्याचे सोहळ्यातील वर्तन अस्वीकार्य आणि हानिकारक असल्याचे अकादमीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यंदा ऑस्करच्या मंचावर जे काही घडले ते अनपेक्षित आणि धक्कागदायकच होते. सूत्रसंचालक ख्रिस रॉक याने मंचावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्लीक उडवली होती. त्याच्या या आचरटपणामुळे संतापलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन ख्रिसच्या कानशिलात भडकावली.

त्यानंतर तो त्याच्या जागेवर येऊन म्हणाला, माझ्या पत्नीचे नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून घेऊ नकोस! सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा विल स्मिथ आणि सूत्रसंचालक ख्रिस रॉक यांच्यामधील या धक्काृदायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता.

विलची पत्नी जेडा हिला एक असा आजार आहे ज्यामुळे तिचे केस गळतात. ख्रिस रॉकने एका चित्रपटातील टक्क ल असलेल्या पात्राशी तिची तुलना केल्याने विल संतापला होता. ऑस्करच्या नियमानुसार विलला आपला पुरस्कार परत करावा लागू शकतो असे आता म्हटले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -