राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्यानंतर तातडीने मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital mumbai) दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मंगळवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांच्या छातीत अचानक वेदना व्हायला लागल्या. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व तपासण्या केल्या असता धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. नंतर त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.
वैद्यकीय सूत्रांनुसार धनंजय मुंडे यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या असून आज सकाळी अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे करुणा शर्मा यांच्यामुळे चर्चेत आहे. धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमधील वजनदार मंत्री आहेत. सरकार सत्तेत आल्यानंतर मुंडे यांच्याकडे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा धक्का, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -