Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पेट्रोल फक्त 1 रुपयात या ठिकाणी मिळणार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पेट्रोल फक्त 1 रुपयात या ठिकाणी मिळणार!

आज देशभरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांनंतर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे एक वेगळाच उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. सोलापूरात बाबासाहेबांच्या जयंतीचा एक वेगळाच उत्साह असतो. यावर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज सोलापुरात 1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिले जाणार आहे. मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये पेट्रोल 1 रुपये लिटरने विकण्याचा निर्णय मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून जाहीर करण्यात आला आहे. सध्या इंधनाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयामध्ये एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरातील डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयामध्ये एक लिटर पेट्रोल मिळणार आहे.

दरम्यान, सोलापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींचा अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. सोलापुरातील मध्यवर्ती उत्सव समितीच्यावतीने 14 एप्रिल ते 17 एप्रिल असा जयंती उत्सव सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील विविध ठिकाणी दिवसभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास पूजा आणि बुद्धवंदना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि विश्वस्त समितीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांकडून यावेळी बुद्ध वंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -