ताजी बातमी ऑनलाईन टीम
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले जोडपे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे आज थाटामाटात पार लग्न पडले. वास्तू बंगल्यावर या जोडप्याने सात फेऱ्या घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली.
दरम्यान हा लग्नसोहळा अतिशय खासगी स्वरुपात पार पडला. लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित मित्रमंडळी उपस्थित होती. असे असले तरीही बाहेर चाहत्यांनी मोठी हजेरी लावली होती.
आलिया आणि रनबीर यांच्या लग्नाच्या प्रत्येक विधींची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. अखेर गुरुवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रणबीर आणि आलिया विवाह बंधनात अडकले