Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगसोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी; झाली ‘एवढी’ मोठी घसरण

सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी; झाली ‘एवढी’ मोठी घसरण

लगनसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोने आणि चांदीला मोठी मागणी लक्षात घेता भाव वाढायला हवेत. मात्र, हे चित्र बदलताना दिसत आहे. बाजारात सोन्यासह चांदीचे दरांत मोठी घसरत होत आहे. कालच्या दरवाढीनंतर आज सकाळच्या सत्रात सोने पुन्हा घसरले आहे. सोबतच चांदी भावात सलग चौथ्या दिवशी अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज जळगावमध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल 390 रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात 290 रुपयाची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात जवळपास 700 रुपयाची घसरण झाली होती. तर दुसरीकडे चांदी 2400 रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. तर या चालू आठवड्यात सोने 3 वेळा स्वस्त तर एक वेळा महागले आहे. या चार दिवसात सोने जवळपास 1400 रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे.

त्यामुळे या चार दिवसात चांदी तब्बल 2500 हजार रुपयाने स्वस्त झाली आहे. रशिया-युक्रेन मधील युद्धादरम्यान, गेल्या मार्च महिन्यात 55 हजारांवर गेलेल्या सोन्याच्या भावात सध्या मोठी घसरण झालेली दिसून येतेय. 9 मार्चला सोन्याच्या दराने 55 हजाराचा टप्पा पार केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात जवळपास 3 हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट 2020) 56200 प्रति तोळ्यावर गेले होते.

गुरुवारी जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52400 रुपये इतका आहे. तर चांदी 66200 रुपये प्रति किलो इतका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -